Rohit Pawar : रोहित पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, बंडखोर आमदारांना केंद्रीय यंत्रणेचा... - Maharashtra news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आज शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बैठक घेतली होती. या झालेल्या सर्व राजकीय उलथापालथी बाबत त्यांना काय वाटतंय, याबाबत त्यांनी आमच्याशी चर्चा मसलत केली. मात्र, विरोधी पक्षात बसलो असलो, तरी सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघाचे जाऊन काम करावे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ( Elections ) विजय आपलाच होईल, असा विश्वास शरद पवार यांनी आमदारांना दिला आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडी तयार करत पक्ष जोडले. मात्र, गेल्या 9 दिवसात संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पक्ष तोडलेला पाहिला आहे. बंडखोर आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाक दाखवून किंवा आमिष दाखवून हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वापरली गेली. मात्र, या सर्व गोष्टी सामान्य माणसाला कळतात असे आजच्या बैठकीतून शरद पवारांनी सर्व आमदारांना सांगितले असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.