Rare White Python Spotted in Karnataka कर्नाटकात आढळून आला दुर्मिळ असा पंधरा अजगर, पहा व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video
कारवार कर्नाटक, कर्नाटकच्या कारवार जिल्ह्यातील Karwar District of Karnataka कुमाता तालुक्यात मिरजन येथील रामनगर येथील रहिवासी सुब्रह्मण्य नायक यांच्या घरात दुर्मिळ पांढरा अजगर आढळून Rare White Python Spotted in Karnataka आला. या सापाची प्रजाती ओळखू न शकल्याने स्थानिक लोकं गोंधळले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच सर्पमित्र पवन नायक यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता पांढरा अजगर असल्याची खात्री झाली. पवन नायक म्हणाले, ही सापाची वेगळी प्रजाती नाही. रंगद्रव्य ग्रंथी म्हणजेच मेलेनिन किंवा त्वचेला रंग देणारे रंगद्रव्य नसल्यामुळे त्वचेला रंग चढत नाही. त्यामुळे रंग पांढरा होतो. याला अल्बिनो स्नेक्स Albino Snakes असेही म्हणतात. परंतु, अल्बिनो सापांच्या बाबतीत, डोळ्यांचा रंग देखील लाल आणि पांढरा असावा. अल्बिनो साप म्हणून त्याचे वर्गीकरण करता येत नाही. कारण त्याचे डोळे फक्त अर्धे पांढरे असतात आणि बाकीचे अर्धे काळे असतात. मात्र, कर्नाटकात आढळणारा हा दुर्मिळ साप आहे. सापाला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे, ते म्हणाले.