ETV Bharat / politics

जनतेला ते लाथ मारत असतील तर जनताच त्याना लाथाडेल; छत्रपती संभाजी राजेंचा टोला

विधानसभा निवडणुकीमुळं सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलय. राजकीय नेत्यांचे राज्यभर प्रचार दौरे सुरू आहेत. तर संभाजीनगरात छत्रपती संभाजी राजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली.

Chhatrapati Sambhaji Raje And Raosaheb Danve
छत्रपती संभाजी राजे व रावसाहेब दानवे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2024, 10:54 PM IST

Updated : Nov 13, 2024, 11:01 PM IST

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे आणि आमचा उद्देश एकच आहे. माझा प्रामाणिक हेतू होता की आपण उमेदवार उभे करायला पाहिजे, विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळं आज स्वराज्य हा पर्याय लोकांना मिळाला आहे. प्रत्येकवेळी पर्याय नाही असं म्हटलं जातं, म्हणून वेगळा पर्याय देण्यात आल्याचं मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केलय. तर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला पाय मारला, तिकडं अब्दुल सत्तार काहीही बोलतात, हे राजकारणातील टगे असून त्यांना आता बाहेर काढलं पाहिजे अशी टीका देखील संभाजी राजे यांनी केली.

म्हणून निवडणूक लढवली नाही : राजकारणात घराणेशाही सुरू असल्यानं सर्वसामान्य लोकांनी काय करावं. ज्या पद्धतीनं उमेदवार उभे केले आहेत त्यामुळं अनेकजण व्यथित आहेत. आमची इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र येऊन सभा घेतली पाहिजे पण ते शक्य नाही, तशी रसद देखील आमच्याकडं नाही. लोकसभेत माझी इच्छा होती. परंतु, तिथे काँग्रेस आणि स्वराज्य युती होती, शाहू महाराज उभे असल्यानं मी उभा राहिलो नाही. मला मराठवाड्यात आणि विदर्भात निवडणूक लढवावी अशी मागणी होती, पण एका मतदारसंघात अडकल्यावर महाराष्ट्रभर फिरता येत नाही. त्यामुळं निवडणूक लढवली नाही असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती (ETV Bharat Reporter)

जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा फायदा कोणाला : मनोज जरांगे यांनी विचार करूनच निर्णय घेतला असेल, समाजाला काय पोषक आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा मागच्यावेळी महाविकास आघाडीला फायदा झाला, आताही तसंच होईल असं सांगतात. काही लोक महायुतीला फायदा होईल असं म्हणतात, पण त्यांच्यामुळं निवडून आलेल्या लोकांनी या सहा महिन्यात काय केलं?, कुणी काहीच बोलत नाही, फक्त भेटून येतात असं संभाजीराजेंनी सांगितलं. तर आम्ही वेगळा सक्षम पर्याय दिलाय. कुणाला काय तर्कवितर्क काढायचे ते आमच्याबाबत काढू द्या, आम्ही निवडणुकीत उतरायचं नाही का?, आम्हाला स्वातंत्र्य नाही का? महाविकास आघाडी किंवा महायुतीत जायचं हा कोणता प्रकार आहे. आम्हाला प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं आहे असं मत संभाजी महाराजांनी व्यक्त केलंय.

सर्वांना घेऊन जावे लागेल : आमच्यासाठी सर्व मराठा म्हणजेच 18 पगड जात यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली पाहिजे. पण आपण विकासावर बोललं पाहिजे, अपल्याकडचे उद्योग बाहेर जात आहेत. निवडणुकीत हेवेदावे सोडून विकासावर बोललं पाहिजे, "75 वर्षात एवढं गलिच्छ राजकारण महाराष्ट्र पाहात आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे जनतेला जर लाथ मारत असतील तर आता जनतेने त्यांना लाथ मारावी, हे सर्व माजलेले टगे आहेत. या माजलेल्या टग्यांना बाहेर काढायचं असल्यास सुसंस्कृत माणसं येणं गरजेचं आहे", हे लाथ मारतात आणि सत्तार काही तरी बोलतात. यांना एकच शब्द आहे ते म्हणजे हे सर्व माजलेले घराणेशाहीतील टगे आहेत अशी टीका, संभाजी महाराजांनी केली. तर माझी बॅग निवडणुकीत नाही तर 365 दिवस तपासा, बॅग सर्वांच्या तपासल्या पाहिजेत असं देखील संभाजीराजे म्हणाले.

हेही वाचा -

  1. "तिसरी आघाडी तयार केली तर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून बघतील..." रोहित पवार यांची टीका - Rohit Pawar news
  2. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील तुम्ही पाणी प्यावं आणि उपोषण सुरू ठेवावं; संभाजीराजेंचा फोन
  3. Chhatrapati SambhajiRaje : 'स्वराज्य संघटना' 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा

Last Updated : Nov 13, 2024, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.