आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांनी केली होती मागणी, मात्र नव्या तारखा जाहीर नाही - आरोग्य विभाग परीक्षा पुणे विद्यार्थी प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - आरोग्य विभागाच्या क आणि ड च्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या कारणातून या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या परीक्षांसाठी दिवसरात्र एक करून आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा नव्याने घेण्याची मागणी होत आहे. परीक्षा रद्द व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी जोरदार मागणी केली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द केल्याचा निर्णय झाला आणि दुसऱ्या नव्या संस्थांकडून या परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाआधी विद्यार्थ्यांनी काय मागणी केली होती? या परीक्षांसंदर्भात ते काय म्हणाले होते? पाहा हा व्हिडिओ.