Heavy Rain Kolhapur : मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; अनेक ठिकाणी झाडं कोसळली - मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज ( गुरुवारी ) कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मान्सूनपूर्व वादळी पावसाने ( Pre monsoon monsoon rains ) अनेकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र सायंकाळी झालेल्या जोरदार ( Heavy rain Kolhapur ) पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. जवळपास एक तासांहून अधिक वेळ शहरातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह धुवांधार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते तर विद्युत खांब सुद्धा कोसळले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागांत अद्याप वीज पुरवठा खंडित झाला आहे. विशेष म्हणजे काही भागात झाडं कोसळल्याने वाहनांचे सुद्धा नुकसान झाले आहे.