Prakash Ambedkar : मी केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानतो की त्यांनी त्यांचेच नेतृत्व संपवले - प्रकाश आंबेडकर - प्रकाश आंबेडकर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15707935-758-15707935-1656668428989.jpg)
पुणे - राज्यात आठ ते दहा दिवस राजकीय सत्ता संघर्षानंतर काल शिवसेनेचे बंड नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली. एकूणच काल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जो निर्णय घेतला त्या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे होतील हे जाहीर केले आणि मी कोणताही पद घेणार नाही अस जाहीर केले. पण एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीच्या वेळेला केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. जर वॉच ठेवण्यासाठी त्यांना हे पद द्यायचे असेल तर त्यांनी ते पद भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला असता. भाजपला जे राज्यभर नेतृत्व मिळत होता. त्या नेतृत्वाचा खच्चीकरण करून दिले आणि यामुळे मी केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानतो की, त्यांनी त्यांचंच नेतृत्व संपवले असे यावेळी आंबेडकर यांनी म्हटले आहे. राज्यात आलेल्या नवीन सरकारबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधीने बातचीत केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी... पाहूया काय म्हणाले...