VIDEO : आज प्रदोष.. प्रदोष व्रत केल्यास मिळते शारीरिक व्याधींपासून मुक्तता.. काय आहे प्रदोषाचे महत्त्व? सांगताहेत महंत अनिकेत शास्त्री देशपांडे.. - प्रदोष आख्यायिका
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : पुराणात प्रदोष व्रतास विशेष महत्त्व सांगितले ( importance to Pradosha Vrata in Puranas ) आहे. प्रदोष दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चा ( Worship of Lord Shiva ) , उपवास केल्याने आरोग्य उत्तम राहून शरीरव्याधी पासून मुक्तता होते, असं महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितलं आहे. एका आख्यायिकेत ( Pradosha legend ) असं सांगितलं आहे की, चंद्र देवाला 27 पत्नी असून, ते फक्त रोहिणी पत्नी वर जास्त प्रेम करत. अशात इतर 26 पत्नी नाराज होऊन चंद्र देवाला शाप देतात. यामुळे चंद्र देव हे दुग्धर आजारानी ग्रासले जातात. अशात चंद्र देव भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करतात आणि शंकर देवाला प्रसन्न करतात. आपल्या आरोग्यासाठी व्रत मागून दोषापासून मुक्त होतात. तो दिवस म्हणजे प्रदोष, या दिवशी मनुष्याने आपल्या शारीरिक व्याधीपासून मुक्त होण्यासाठी आणि निरोगी आयुष्य प्राप्त करण्यासाठी भगवान शंकराची मनोभावे पूजा करावी असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी म्हटलं ( significance of Pradosha ) आहे.