VIDEO : पहा आंध्रप्रदेशातील डुक्करांची झुंज - राजमुंद्री डुक्कर झुंज
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती ( आंध्र प्रदेश ) आंध्र प्रदेशात संक्रांती हंगामात होणाऱ्या कोंबड्यांची झुंज, घोड्यांच्या शर्यती, बैलांच्या झुंजीबद्दल ( bull fights during Sankranti season ) लोकांना माहिती आहे. पण, आता एक नवीन ट्रेंड वाढत आहे. आंध्र प्रदेशातील एलुरु जिल्ह्यातील द्वारका तिरुमला येथे डुक्करांच्या झुंजीचे ( Pig fights in Dwaraka Tirumala ) आयोजन करण्यात आले आहे. डुकरांची झुंज ( rajahmundry organised pig fight ) पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. द्वारका तिरुमला येथील वेंकट कृष्णपुरम रस्त्यावरील निर्जन ठिकाणी डुक्करांची झुंज आयोजित करण्यात आली होती. द्वारका तिरुमला आणि राजमुंद्री येथील लोकांनी या झुंजीचे आयोजन केले होते. दोन डुकरांपैकी जो पळून न जाता थांबतो, त्या डुक्कराला विजेता घोषित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान राजमुंद्री येथील डुक्कर पळून गेले. द्वारका तिरुमला येथील डुकराला विजयी घोषित करण्यात आले.