EXCLUSIVE : मुसळधार पावसाने पन्हाळा गड पुन्हा ढासळू लागला; पायथ्याला राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती - पन्हाळा गड पुन्हा ढासळू लागला
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : गेल्या दोन ( Kolhapur District ) दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पन्हाळा गड ( Panhala Fort ) पुन्हा ढासळू लागल्याचे पाहायला ( Panhala Fort Started Collapsing ) मिळाले. आज सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास चार दरवाजा खालील काही भाग कोसळू लागल्याचे पाहायला मिळाले. पन्हाळा गडाच्या नाक्याजवळ ज्या ठिकाणी गतवर्षी रस्ता खचला होता. त्याच्याच उजव्या बाजूकडील एकेक दगड निसटतानाचे दिसून आले. येथील नागरिकांनी हे चित्र आपल्या कॅमेरात कैद केले असून, याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
Last Updated : Aug 8, 2022, 12:30 PM IST