आषाढी वारी : काय आहे तुळस, वारकरी आणि विठ्ठलाचे नाते... - tukaram maharaj
🎬 Watch Now: Feature Video
पंढरीचे वारी जयाचीये कुळीं
त्याची पायधुळ लागो मज...
खरंतर वारी हा आनंद, चैतन्य निर्माण करणारा वारकऱ्यांचा उत्सव.. या वारीत दरवर्षी लाखो वारकरी जातात. आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर माऊलींची तर देहू ते पंढरपूर संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. या वारीत पुरुषांबरोबरच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या वारीत महिला डोक्यावर तुळशीचे वृदांवन घेऊन पंढरपूरपर्यंत चालतात. तुळस, वारकरी आणि विठ्ठल यांचे नेमके काय नाते पाहुया...