Karnataka : स्मशानभूमीकडे जायला नव्हता रस्ता.. ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून काढली अंत्ययात्रा.. पहा व्हिडीओ - स्मशानभूमीकडे जायला नव्हता रस्ता
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16040690-thumbnail-3x2-antyayatra.jpg)
शिवमोग्गा (कर्नाटक): अंत्यसंस्कारासाठी योग्य रस्ता नसताना पाण्यातून चालत जात अंत्ययात्रा काढण्यात आल्याची घटना जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यातील कोडलू गावात घडली. कोडलू गावातील तम्मय्या गौडा (80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह पाण्यातून खांद्यावर उचलून घेत स्मशानभूमीत जात अंत्यसंस्कार केले. प्रत्येक पावसाळ्यात स्मशानभूमीचा रस्ता जलमय होतो. त्यामुळे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेणे हे आव्हानात्मक काम होत आहे. स्मशानभूमीचा रस्ता पावसाळ्यात चार ते पाच महिने तुडुंब भरलेला असतो. रस्ता उंच करण्यासाठी अनेक वेळा विनंती करूनही कार्यवाही होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. ( No road to cemetery ) ( villagers carried dead body in water )