Jayant Patil : राज ठाकरेंच्या भूमिकेवरुन जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्हीही श्रीरामाचे भक्त आहे पण..." - जयंत पाटील महागाई
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - मागील काही दिवसांपासून राज्यात भोंगे ( Loudspeaker Controversy ), हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) यावरुन वादळ उठले आहेत. त्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महागाई, राज ठाकरेंची भूमिका आणि हनुमान चालीसा वाद यावर आपली प्रतिक्रिया 'ईटिव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. राज ठाकरेंवर बोलताना पाटील म्हणाले की, लोकांना संभ्रमित करण्याचे काम ते करत आहेत. मशिदीवर भोंगे आहेत आम्ही तर आमच्यावर मंदिरावर हनुमान चालीसा म्हणू. म्हणायला कोणाचीही बंदी नाही. आम्ही सुद्धा हनुमान आणि श्रीरामचे भक्त आहे. पण, याचे प्रदर्शन करण्याची गरज नाही. याचा अर्थ काहीना काही त्यांच्या मनात हेतू आहे, अशी शंका पाटील यांनी व्यक्त केली ( Jayant Patil React On Raj Thackeray ) आहे.