Navneet Rana Criticized Shivsena : 'राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचे प्रतिबिंब दिसते, लवकरच ते उद्धव ठाकरेंची जागा घेणार' - नवनीत राणा उद्धव ठाकरे टीका
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15042265-thumbnail-3x2-navneet.jpg)
अमरावती - हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्यांनी मातोश्री समोर बसून हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे संस्कार विसरले असून त्यांना हिंदु्त्त्वाचा विसर पडला आहे. खरं तर बाळासाहेबांचे प्रतिबिंब राज ठाकरेंमध्ये दिसते आणि ते लवकरच उद्धव ठाकरेंची जागा घेणार, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.