Milky Way Video : आकाशात दिसला लाखो ताऱ्यांचा समूह 'मिल्की-वे'; अद्भुत दृश्य लोक बघतच राहिले - Milky Way Video
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15987131-thumbnail-3x2-milky-way-video.jpg)
इदलिब (सिरिया) - सीरियाच्या इदलिब शहरात रविवारी रात्री एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. ताऱ्यांचा समूह 'मिल्की वे' ( milky way over syria idlib ) येथे आकाशात दिसला. तो लाखो ताऱ्यांचा समूह आहे. सामान्यतः उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नसते. पण इथे ते दिसले. साहजिकच यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. खरे तर टाइमलॅप्स इमेजमुळे ते पाहणे शक्य झाले, कारण ते डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. कारण ते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर आहे. अशी खगोलीय घटना पाहणे हा लोकांच्या कुतुहलाचा विषय राहिला आहे. बंडखोर गट आणि सीरियन सैन्य यांच्यातील आघाडीच्या जवळ असलेल्या अल नायरब भागात हे दिसून आले.