Pune News : पुढील आठवडाभर राज्यातील पारा चढणार - हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे: भारतीय हवामान विभागाच्या डेटानुसार, हवामानाचा विचार करता हा एप्रिल असामान्य होता. गेल्या काही वर्षांतील एप्रिल महिन्याच्या तुलनेत थंडी जास्त होती. 1987 मध्ये 43.3 अंश सेल्सिअस एप्रिलमधील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काल पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 44.2 सेल्सिअस तापमानाची ( Koregaon Park Temperature ) नोंद झाली आहे. सध्या हवामानाची आणीबाणी आली असून अश्याच पद्धतीने पुढील आठवड्यापर्यंत राज्यातील तापमान वाढणार आहे. राज्यातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांमध्ये 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढत जाणार आहे, अशी माहिती हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे ( Meteorologist Dr. Ramchandra Sable ) यांनी दिली