Shastrartha Sabha Controversy : गोविंददास यांच्यावर माईक उगारल्यानंतर महंत सुधीर पुजारी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी त्यांना... - Shastrartha Sabha

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 31, 2022, 4:58 PM IST

नाशिक - हनुमान जन्मस्थळाचा वाद ( Hanuman Birth Place Controversy ) मिटवण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा नाशिक ( Shastrartha Sabha Nashik ) येथे घेण्यात आली. यावेळी द्वारका पीठाधीश्वर शंकराचार्य हे काँग्रेसचे असल्याचे महंत सुधीर पुजारी यांनी म्हटले त्यावरून गोविंद दास संतापले. यानंतर सुधीर पुजारी यांनी माफी मागावी असे गोविंददास यांनी म्हटले यावरून वाद पेटला. यादरम्यान सुधीर पुजारी यांनी माईक गोविंददास यांच्यावर उगारला ( Manhat raised mic on Shankaracharya Govinddas ). त्यानंतर पोलिस बंदोबस्त मध्ये गोविंददास यांना एका खोलीमध्ये बंद करण्यात आले. माफी मागितल्याशिवाय नाशिक सोडणार नाही असे गोविंददास यांनी म्हटलेय. दरम्यान सुधीर पुजारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, आपण त्यांच्यावर माईक उगारला नाही, तर त्यांना आपण मोठ्याने बोला असे म्हणत होतोत. आम्हाला शंकराचार्य यांचा आदर असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.