VIDEO : माळी समाजाला स्थानिक स्वराज संस्थांमध्ये लोकसंख्यच्या तुलनेत नेतृत्व मिळाले; माळी महासंघाची मागणी - नागपूर माळी महासंघाची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसींमधील मोठा घटक असलेल्या माळी समाजाने सुद्धा आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी महासंपर्क अभियानाला उपराजधानी नागपुरातुन सुरुवात केली ( Mali Federation Mahasampark Abhiyan Nagpur ) आहे. आज समता संस्कृतिक भवनात माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वात मेळावा घेऊन समाजातील प्रश्न आणि त्यावर सोडण्यासाठी चर्चा करण्यात आली. ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजाला लोकसंख्ये प्रमाणे प्रतिनिधित्व मिळावे हा मुख्य उद्देश या महासंपर्क अभियानाचा असणार ( Nagpur Mali Federation Demand ) आहे. माळी समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व मिळावे. जय ज्योती जय क्रांतीचा नारा देत अभियानाला सुरुवात झाली आहे. सरकारमधील सरंजामनशाही गट ओबीसी विरोधी असल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून याचा फटका माळी समाजाला बसला आहे. माळी समाजाला स्थानिक स्वराज संस्थांमध्ये लोकसंख्यच्या तुलनेत नेतृत्व मिळाले पाहिजे, यासह भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक जाहीर करून अभ्यासिका निर्माण करावी, माहात्मा ज्योतिबा फुलें आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याच्या मागाणी समाजाच्या समोर आणून मागणीला जोर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. माळी महासंघ कुठल्या राजकीय पक्षाला बांधला नाही असाही दावा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी माध्यमांशी बोलतांना केला.