COVID-19: सेवानिवृत्त पोलिसाचे भन्नाट गाणे... - corona news
🎬 Watch Now: Feature Video
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगात हाहाकार उडवला आहे. जगातील प्रत्येक देश या आजारापासून त्यांच्या जनतेला दूर ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. वेळप्रसंगी बळाचा वापरही होत आहे. नवनवीन क्लुप्त्या वापरुन जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस, माध्यमे आणि विविध समाजसेवकांमार्फत देखील जनजागृती केली जात आहे. अशीच एक जनजागृती परभणीचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दासराव पुंडगे यांनी आपल्या शाहीरी अंदाजातून गायलेल्या गाण्यातून केली आहे.