कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्य आठव्या स्थानावर, नागरिकांनी मास्क वापरावा - आरोग्यमंत्री टोपे - corona patients number maharashtra rajesh tope react
🎬 Watch Now: Feature Video

जालना - महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णसंख्या कमी असून, राज्य सध्याच्या अॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत 8 व्या नंबरवर आहे. राज्यात चांगल्या पद्धतीने झालेल्या लसीकरणाचा हा परीणाम आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असून, केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केले जाऊन आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील. मात्र, मास्क नागरिकांनी वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. भविष्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास मास्कसक्ती करावी लागेल, असा इशारा देखील टोपे यांनी दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त टोपे यांच्या हस्ते जालन्यात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.