Raj Thackeray Video : 'त्या' 135 मशिदीवर कारवाई का केली नाही? राज ठाकरेंचा पोलिसांना सवाल - Raj Thackeray news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - हनुमान चालिसाचे आंदोलन ( hanuman chalisa row ) हे एक दिवसाचे नाही. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात ( mosque Loudspeaker issue ) नाही, तोपर्यंत मनसे मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवत ( Hanuman Chalisa recitation ) राहतील, असा पवित्रा राज ठाकरे यांनी ( Raj Thackeray On Loudspeaker issue ) घेतला आहे. आज सकाळपासून मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला. याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात 90 ते 92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झालेली नाही. त्या मशिदीतील मुल्ला-मौलवींचे मी आभार मानतो. दरम्यान त्यांनी 135 मशिदींवर सकाळची अजान ही लाऊडस्पीकर लावून झाली आहे. या मशिदींवर कोणती कारवाई महाराष्ट्र पोलीस करणार आहे, असा सवाल राज ठाकरे ( Raj Thackeray On Mumbai Police ) यांनी केला आहे.