Kolhapur Viral Video : तबकडी, एलियन्सच्या चर्चेचे उधाण, कोल्हापुरात आकाशातील मोठ्या फुग्याने वाढवले कुतुहल - big balloon in kolhapur
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15456200-651-15456200-1654180315769.jpg)
Kolhapur Viral Video : कोल्हापूर - कोल्हापूरसह आजूबाजूच्या काही जिल्ह्यातून सुद्धा आज आकाशात एक शुक्र ग्रहासारखे अनेकांना पाहायला मिळाले. अनेकांनी हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असावे, असे म्हटले तर काहींनी उपग्रह असावा असा अंदाज व्यक्त केला. मात्र काही अतिउत्साही लोकांनी तर तबकडी आणि एलियन्स म्हणून याचा संबंध जोडला. मात्र कोल्हापुरातील खगोल अभ्यासकांनी याबाबत आपली प्रतिक्रिया देताना यापैकी कोणताही प्रकार घडला नसून हे केवळ हवामान खात्याकडून हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेला फुगा असावा असा अंदाज व्यक्त केला ( big balloon in kolhapur ) आहे. दरम्यान, या फुग्यामुळे कोल्हापुरातील सोशल मीडियात मात्र वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळाल्या.