James Laine : जेम्स लेनने 'त्या' पुस्तकातील एक पान फाडून टाकावे - जितेंद्र आव्हाड - मंत्री जितेंद्र आव्हाड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 17, 2022, 7:09 PM IST

ठाणे : जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरून ( James Laine Chhatrapati Shivaji Maharaj Book ) पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याच पुस्तकाच्या विषयावरून मनसे आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप होत ( MNS Vs NCP ) आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत जेम्स लेन ने विशद केले की, बाबासाहेब पुरंदरे हे आपल्या माहितीचे स्त्रोत ( James Laine On Babasaheb Purandare ) नव्हते. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) संतापले आहेत. जेम्स लेन याची ज्यांनी मुलाखत घेतली ( James Laine Interview ) आहे. त्यांना एवढचं सांगायचं आहे की, गलिच्छ लिखाण काढून टाकावे. ज्याने मुलाखत घेतली त्याने ते पुस्तक वाचावे. हे लिखाण महाराजांविषयी शंका निर्माण करणारे आहे, असे ते म्हणाले. गेलेल्या माणसांबदल बोलणे बरोबर नाही. माझे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे वैयक्तिक वैर नव्हते. विचारांचे वैर असणे लोकशाहीचा भाग आहे. आजपर्यंत मी हे पान वाचून दाखवले नव्हते. जेम्स लेनच्या पुस्तकातील एक एक वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आहे. हे पुस्तक माझे तोंडपाठ आहे. महाराष्ट्राच्यावतीने जेम्स लेनला एवढेच सांगायचे आहे की, एक पान फाडून टाक आणि त्यानंतर दुसरी आवृत्ती काढ, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.