Intrigue To Bring BJP Power : राष्ट्रपती राजवट लावून भाजपची सत्ता आणण्याचा डाव - Intrigue To Bring BJP Power

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 26, 2022, 2:13 PM IST

मुंबई - शिवसेनेचे आमदार ( Shivsena MLA) फोडून बंडखोरी करायला लावण्यामागे भाजपाचीच खेळी ( BJPs Game ) आहे. आसाममध्ये प्रचंड पावसामुळे मोठं संकट निर्माण झालेलं असताना तिथले भाजपाचे मुख्यमंत्री मात्र महाराष्ट्रातून बंडखोरी करून गेलेल्या आमदारांच्या दिमतीला आहेत. आसाममधील नागरिकांमध्येच याचा प्रचंड रोष आहे. भाजप अतिशय घाणेरडं राजकारण ( BJP Dirty Politics ) करीत आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बडोद्यात गेले याचा अर्थच असा आहे की, महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवायचा प्लान त्यांनी केला आहे. एक एक आमदाराला ५०- ५० कोटी देण्याचे आमिष दाखवले गेले आहे. आता तर राज्यपालांच्या माध्यमातून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून नंतर राज्यात भाजपची सत्ता आणण्याचा घाट घातला जात असल्याचे आम्ही मीडियाच्याच माध्यमातून बघत आहोत. मात्र यातून भाजपाचेच नुकसान होणार आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना ओळखून आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.