मनसुख हिरेन हत्या प्रकरण; सीएफएसएल टीमकडून चार गाड्यांची तपासणी - mumbai live news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11681207-254-11681207-1620441883665.jpg)
मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरणी शुक्रवारी पुण्याची फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीम एन.आय.ए. कार्यालयात दाखल झाली होती. या टीमने चार गाड्यांची तपासणी केली. मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरणी आतापर्यंत 9 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक गाड्यांचा कुठे ना कुठे संबंध हा या दोन्ही प्रकरणाशी आल्याचं आत्तापर्यंत समोर आले आहे. यापूर्वी पाच गाड्यांची फॉरेन्सिककडून तपासणी करण्यात आली होती. उर्वरित चार गाड्यांची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. गाड्यांमधून काही नमुने ताब्यात घेण्यात आले.