Gumla: अल्पवयीन मुलाने फोडल्या गाड्यांच्या काचा; सीसीटीव्हीचा व्हिडीओ व्हायरल - गुमला येथे अल्पवयीन मुलाने वाहनांच्या काचा फोडल्या
🎬 Watch Now: Feature Video
गुमला - तीन डझनहून अधिक वाहनांच्या काचा फुटल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील पालकोट रोड, मेनरोडसह विविध चौक चौकात उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले आहे. या घटनेनंतर लोक भयभीत झाले असून शहरात अफवांचा बाजार तापला आहे. पण सीसीटीव्ही फुटेजमधून जे समोर आले त्यामुळे सर्व अफवा आणि अटकळांना पूर्णविराम मिळाला. येथील लिफ्ट बागानमध्ये राहणाऱ्या एका मुलगा मानसिकदृष्ट्या खचला असून त्याने ही घटना घडवून आणली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.