तरसाचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी, पाहा व्हिडिओ - Hyena Video
🎬 Watch Now: Feature Video
साबरकांठा (गुजरात) : इडर तालुक्यातील पाटडिया गावात वन्य प्राण्याने महिलेवर हल्ला ( Hyena attack a woman ) केला. महाकाली मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर तरसाने प्राणघातक हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी वनविभागाचे पथक वन्यप्राण्याला पकडण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाला माहिती देऊन घटनास्थळी पोहोचल्यानंतर तरसाला पिंजऱ्यात पकडले.