VIDEO : नवी मुंबईत मुसळधार पाऊस, खांदेश्वर रेल्वे स्थानकात शिरले पाणी - नवी मुंबई मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15738398-thumbnail-3x2-op.jpg)
नवी मुंबई - काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy rain in Navi Mumbai ) नवी मुंबई शहर, पनवेल, उरण परिसरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरल्याने ( Water seeped at Khandeshwar railway station ) नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. नवी मुंबईत नेरुळ वगळता अनेक रेल्वे स्थानकात जाण्याचे मार्ग भूमिगत आहे. परिणामी खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरले. त्यामुळे लोकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. पावसाचा जोर कायम असल्याचे पाणी स्थानकात शिरत होते. रेल्वे स्थानकात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तेथे पंप लावण्यात आले.