Kavinder Gupta Visited Shirdi : महाराष्ट्रातील सरकार जास्त काळ टिकनार नाही - कविंदर गुप्ता माजी उपमुख्यमंत्री - कविंदर गुप्ता यांची सरकारवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी (अहमदनगर) - महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकनार नाही. ज्यांचे विचार जुळत नाही अशा लोकांची ही आघाडी आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या असलेले सरकार जास्त दिवस टिकणार नाही. एकेकाळी देशभर आपल्या विचारधारेमुळे ओळखल्या जाणाऱ्या लोकांनी आपली विचारधारा बदलली असल्याचा टोला शिवसेनेचे नाव न घेता जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता ( Former Deputy CM of Jammu and Kashmir Kavinder Gupta ) लगावला. जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन ( Kavinder Gupta visited Sai Baba Temple Shirdi ) घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपा युवामोर्चाप्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे होते. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना गुप्ता म्हणाले. 370 कलम हाटवल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अतिशय शांततेचे वातावरण आहे. आता या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा फडकवला जात नाही. दगडफेक बंद झाली आहे. तसेच वातावरण बदलल्याने लाखो पर्यटक निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी तिथे येत आहेत. पुढच्या काळात परिस्थीती आणखी सुधारले असा विश्वासही गुप्ता यांनी व्यक्त केला.