Har Ghar Tiranga : जामखेडच्या इतिहासात पहिल्यादाच १११ फूट भव्य तिरंगा रॅली - Har Ghar Tiranga
🎬 Watch Now: Feature Video
जामखेड - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी ( azadi ka amrit mahotsav ) वर्षानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने 111 फुटी तिरंगा पदयात्रेचे आयोजन ( 111 foot tricolor rally ) करण्यात आले होते. देशभरात हर घर तिरंगा ( har ghar tiranga ) अभियानाच आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. जामखेडच्या इतिहासामधील ही पहिली भव्य तिरंगा पदयात्रा असून यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले ( tricolor rally in Jamkhed ). या निमित्ताने देशात हर घर तिरंगा हे अभियान चालवले जात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ( ABVP ) छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड पासून 111 फुट लांबीचा तिरंगा घेऊन ध्वज यात्रा सुरू झाली. या यात्रेचे जामखेडकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात यानंतर यात्रेची सांगता जामखेड महाविदयालयाच्या परिसरात झाली.
Last Updated : Aug 5, 2022, 5:32 PM IST