Shinde - Desai Supporters Rally : एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाईंच्या समर्थनार्थ पाटणमध्ये कार्यकर्त्यांची रॅली - शंभूराज देसाई
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे म्हणून एकनाथ शिंदे यांनी बंड ( Shivsena Rebel Leader Eknath Shinde ) केल्यानंतर त्यांना साथ देणार्या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोर नेत्यांच्या घर, कार्यालयांवर हल्ले तसेच बंडखोरांविरोधात आंदोलने ( Agitations Against Rebels ) होत आहेत. सातार्यातील शिवसैनिकांनी शनिवारी (दि. 25) गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई ( Shambhuraj Desai )यांच्या पोवई नाक्यावरील निवासस्थाबाहेर आंदोलन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे आणि शंभूराजे देसाईंच्या समर्थनार्थ मल्हारपेठ, ढेबेवाडी (ता. पाटण) येथे रविवारी शंभूराज देसाईंच्या समर्थकांनी रॅली काढली. एकनाथ शिंदे आणि शंभूराजे देसाई यांच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या.