एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यपालांची घेणार भेट - आंतरराष्ट्रीय विमानतळ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 30, 2022, 1:54 PM IST

गोवा - शिवसेना बंडखोर आमदारांची बैठक संपली असून, सर्व आमदार यांनी भाजपला आपला समर्थन दिलं आहे. या समर्थन दिलेल्या आमदारांचा पत्र घेऊन एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत थोड्यावेळात आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते मुंबईच्या दिशेने दाखल होतील आणि या आमदारांचे समर्थन असलेले पत्र भाजप व राज्यपालांना सुपूर्त करतील. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडदा पडला आहे. आता राज्यपाल विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करू शकतात. भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अद्याप भाजपसोबत मंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. कोणत्याही याद्या तयार केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे ट्विट बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel mla eknath shinde ) यांनी केले आहे.एकीकडे एकनाथ शिंदे जरी ट्विटच्या माध्यमातून असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात मात्र चर्चेच्या फेरी सुरू झाल्या आहेत. लवकरच याबाबतची स्पष्टता होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून विशेषता शिवसैनिकातून एकनाथ शिंदे यांच्या गटाला होत असलेला विरोध पाहता आम्ही शिवसैनिकच आहोत आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी आणखी एका ट्विट ( Eknath Ehide Tweet ) च्या माध्यमातून स्पष्ट करीत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पन्नास आमदार ( 50 MLA ) गळायला लावले. ठाकरे सरकार यामुळेच कोसळले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. याबाबत वाटाघाटी सुरू असून असे वाटप झाल्याच्याही वावड्या उठल्या आहेत. मात्र भाजपसोबत कोणती आणि किती मंत्री पदे येतील याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. लवकरच होईल मात्र तोपर्यंत कोणत्याही याद्या आणि त्याबाबत असलेले अफवा पसरवू नका ( Don't spread rumors ) असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. हेही वाचा - Eknath Shide Tweet : अद्याप मंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा नाही; एकनाथ शिंदेंचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.