CM Eknath Shinde Video : राहुल शेवाळेंची लोकसभेतील शिवसेना गटनेते पदी निवड; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती -
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Met Shivsena MP ) यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde in Delhi) हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र सादर केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनेच्या बारा खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिले आहे. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचे पत्र दिले आहे. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांना लोकसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता दिली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ( 12 Shiv Sena MP letter to Lok Sabha Speaker ) ( Eknath Shinde Delhi press conference with shiv sena rebel MP )