Ambedkar Jayanti : दोन हजार 51 वह्यांचा वापर करून साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती - Bheem Jayant 2022
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15011712-thumbnail-3x2-news.jpg)
ठाणे - विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती ( Ambedkar Jayanti ) निमित्ताने 2 हजार 51 वह्यांचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. कल्याण पूर्वेकडील महापालिकेच्या 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यलयाच्या समोरील मैदानात 660 स्केअर फूट जागेत साकारण्यात आली आहे. ही प्रतिकृती साकारण्यासाठी तब्बल 24 तासांचा अवधी लागला. नगरसेवक निलेश शिवाजी शिंदे यांच्या सौजन्याने रुपेश गायकवाड, माकम, रोहन जगताप या तिघांही ही कलाकृती साकारली आहे. या वह्या जयंतीच्या दिवशी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Last Updated : Apr 13, 2022, 10:56 PM IST