Pitru Paksha 2022: सर्वपितृ अमावस्येनिमित्त रामकुंड परिसरात श्राद्ध विधी करण्यासाठी भाविकांची गर्दी - पितृ पक्ष 2022

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 25, 2022, 3:51 PM IST

नाशिक : नाशिकच्या गोदावरी नदी तीरावरील रामकुंड परिसरात (Ramkund area occasion of Sarva Pitru Amavasya) आज सर्वपित्री अमावस्या (Pitru Paksha 2022) निमित्त पितरांचे श्राध्द करण्यासाठी भविकांची मोठी गर्दी झाली (Devotees flock to perform Shraddha rituals) होती. देशाभरातून भाविक या ठिकाणी आले आहेत. तिथी नुसार रविवार दिनांक 25 सप्टेंबर हा दिवस सर्वपित्री अमावास्येचा मानण्यात आल्याने; रामकुंड परिसरात पितरांना नैवेद्य देण्यासाठी येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सर्वपित्रीचे श्राद्ध घालण्यासाठी दिवसभर या परिसरातील लोक मिळेल त्या जागेवर बसून श्राद्ध विधी करत होते. यंदाची सर्वपित्री अमावस्याला रविवारी पहाटे 3.13 मिनिटांनी प्रारंभ झाल्यामुळे दिवसभर श्राद्ध आणि तर्पण विधी करण्यासाठी रामकुंड परिसरात जागा कमी पडली होती. गोदावरीला पाणी सोडण्यात आलेले असल्यामुळे. गांधी तलावावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रामकुंडाच्या भागात हे श्राद्ध विधी होत होते. पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांचे स्मरण करण्यास ज्यांना जमले नाही, ज्यांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नाही, अशांसाठी सर्वपित्री अमावास्या हा श्राद्धाचा दिवस मानण्यात येतो. घरोघरी श्राद्ध तर्पणाचे विधी केले जातात. त्यात रामकुंड परिसरात श्राद्धाला महत्त्व असल्यामुळे येथे हे विधी करण्यासाठी या पंधरवड्यात गर्दी होत असते. त्यात शेवटचा दिवस म्हणून सर्वपित्रीला दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी गर्दी झाली होती. अमावास्येस रविवारी पहाटे 3 वाजून 13 मिनिटांनी प्रारंभ झाला. सोमवारी पहाटे 3 वाजेपर्यंत अमावास्या राहील.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.