Devendra Fadnavis meets Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट; शर्मिला ठाकरेंकडून औक्षण - Shivteerth

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 15, 2022, 1:54 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांची नुकतीच मिटींग पार पडली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ इथल्या निवासस्थानी ही मिटींग पार पडली. राजकीय दृष्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी भगव्या रंगाची शाल आणि पुष्प गुच्छ दिले. त्याशिवाय शर्मिला ठाकरे ( Sharmila Thackeray ) यांनी देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण केले. सध्या अमित ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणावरून चर्चा आहेत. त्यामुळे अमित ठाकरे ( Amit Thackeray ) लवकरच राडजकारणात सक्रीय होण्याच्या शक्यता गडद झाल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुढच्या पिढीमुळे शिवसेनेला शह मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी रवाणा झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.