VIDEO : बंदी झुगारून भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी..पायऱ्यांवर भिजून वर्षा पर्यटनाचा आनंद

By

Published : Jul 11, 2021, 5:44 PM IST

thumbnail

पर्यटनस्थळी गर्दी करू नका त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढत आहे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील नागरिकांना केले होते. परंतु, त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत लोणावळा येथील भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. लोणावळा शहर पोलिसांकडून पर्यटकांना तिथे येण्यास मज्जाव केला जात असला, तरी पुणे आणि मुंबईमधून मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे. डॅमवर मोठ्या संख्येने पर्यटक पाहायला मिळाले असून त्यांनी भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला. लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. लोणावळा शहराचे आकर्षण असलेल्या भुशी धरणावर भिजण्यासाठी एकच झुंबड उडत आहे. लोणावळा शहर पोलिसांचा बंदोबस्त जागोजागी पाहायला मिळत असून पर्यटक पोलिसांची नजर चुकवून जात असल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.