खड्डे आणि ट्राफिक चुकवण्यासाठी बावनकुळेंची लोकलला पसंती, दांडियासाठी रेल्वे प्रवास - Chandrasekhar Bawankule
🎬 Watch Now: Feature Video
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईच्या लोकलने प्रवास केला. प्रवीण दरेकर यांच्या दांडिया कार्यक्रमासाठी जाण्यासाठी बावनकुळे यांनी रेल्वेने प्रवास केला. मुंबईतील खड्डे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बावनकुळे यांनी लोकलने प्रवास केला असल्याचे बोलले जात आहे. या प्रवासावेळी त्यांनी प्रवाशांसोबत चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.