औरंगजेबाच्या कबर भेटीवरून शिवसेना आणि एमआयएम आमने समाने; खैरेंच्या टीकेला जलील यांचे प्रत्युत्तर
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - औरंगजेबाच्या कबरी वरून पुन्हा एकदा शिवसेना आणि एमआयएम आमने समाने आली आहे. एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज काय होती? असा प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित करत ओवेसी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. एएमआयएम ( AIMIM ) सामाजिक स्वास्थ खराब करत असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी केला. मुस्लिम लोक देखील औरंगजेबाला ( Aurangzeb Grave Controversy ) मानत नाही. कोणी त्यांच्या कबरीवर जात नाही, आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवले का? नाही ना, मग एमआयएमच्या नेत्यांना का जायची गरज पडते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दोन दिवस आधी असे कृत्य करून त्यांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली. त्याला खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्यात कोणाची कबर दिसली की प्रार्थना करण्याची परंपरा आहे. त्याला आम्ही डावलू शकत नाही, त्यावर राजकारण कशासाठी, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel on Chandrakant Khaire ) यांनी उपस्थित केला होता.
TAGGED:
शिवसेना आणि एमआयएम आमने समाने