NCP On Navneet Rana : युसूफ लकडावाला प्रकरण; नवनीत राणांच्या चौकशीची राष्ट्रवादीकडून मागणी - नवनीत राणा युसूफ लकडावाला प्रकरण राष्ट्रवादी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15132360-thumbnail-3x2-ncp.jpg)
मुंबई - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी आपल्या एफिडेविट मध्ये दाऊदचा हस्तक असलेला युसूफ लकडावालाकडून ( Yusuf Lakdawala Money Laundering Case ) 80 लाख घेतले असल्याचा उल्लेख केला आहे. गंभीर गुन्ह्यात दोषी असलेल्या युसूफ लकडावालाकडून नवनीत राणांनी 80 लाख रुपये का घेतले? याबाबतची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेने केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे ( NCP On Navneet Rana ) यांनी केली आहे. ते प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.