thumbnail

Newborn Stolen In Meerut मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये नवजात बालकाची चोरी, सीसीटीव्ही व्हायरल

By

Published : Aug 31, 2022, 10:58 AM IST

मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये Meerut Medical College नवजात मूल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी घडली. मेरठच्या किथोर भागातील महलवाला गावातील रहिवासी असलेल्या डॉलीला सोमवारी दुपारी प्रसूतीच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाला जन्म झाल्यानंतर मंगळवारी मूल चोरून अज्ञात व्यक्ती फरार झाला Newborn Stolen In Meerut आहे. रुग्णालय प्रशासनाला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला. आरोपीसोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी तरुणाचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपी तरुणाला अटक करून नवजात बाळाला शोधण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.