साईचरणी तब्बल 1 कोटी रुपयांची सुवर्ण पंचारती अर्पण; पाहा व्हिडिओ - Gold Pancharati - GOLD PANCHARATI
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/06-10-2024/640-480-22617763-thumbnail-16x9-shirdi.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 6, 2024, 7:34 AM IST
शिर्डी : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी टाकतात. अशातच शनिवारी (5 ऑक्टोबर) संध्याकाळी मुंबई येथील एका साईभक्तानं साईचरणी 1 किलो 434 ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सोन्याची पंचारती अर्पण केली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलीय. साई चरणी दान करण्यात आलेल्या या सुवर्ण पंचारतीची किंमत जवळपास सुमारे 1 कोटी रुपये आहे. ही सुंदर नक्षिकाम असलेली ही पंचारती साईबाबांच्या चरणी अर्पण करुन गोरक्ष गाडीलकर यांच्याकडं सुपुर्द करण्यात आली. त्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.