Building Collapses In Dakshina : पत्त्याच्या पानांसारखी कोसळली इमारत; पाहा व्हिडिओ - वोरकाडीजवळील सुनकडकट्टे येथे एक इमारत कोसळली
🎬 Watch Now: Feature Video
सुल्या (दक्षिण कर्नाटक) - केरळ-कर्नाटक सीमेवर वोरकाडीजवळील सुनकडकट्टे येथे एक इमारत कोसळली आहे. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता, इमारत आदल्या दिवशीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही इमारत वरकडी येथील रहिवासी सुरेंद्र पुजारी यांची आहे. तीन मजली असलेली ही इमारत 10 वर्षापूर्वी बांधण्यात आली होती. मागील काही दिवसांपूर्वी खालील भागात असलेली दरड कोसळल्याने इमारतीला तडा गेला होता. त्याच पार्श्वभूमीवर इमारतीला धोका असल्याचा इशाराही देण्यात आला होता. या इमारतीमध्ये दोन कुटुंबे तसेच टेलरचे दुकान, फर्निचरचे दुकान, भाजपचे कार्यालय आदी ( Building Collapses In Dakshina ) होते.