BJP Agitation Against Deepali Sayyad : दीपाली सैय्यदवर गुन्हा दाखल करण्याची भाजपा महिला आघाडीची मागणी - नागपूर भाजपा महिला आघाडी आंदोलन बातमी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - शिवसेनेच्या नेत्या तथा अभिनेत्री दीपाली सैय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्दचा वापर केल्याने भाजप महिला आघाडीने उपराजधानी नागपुरात जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी एकत्र होत आंदोलन करत घोषणा दिल्यात. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना निवेदन देत दीपाली सैय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.