Maharashtra Cabinet Expansion : जनतेच्या रखडलेल्या कामांना आता गती येणार - राधाकृष्ण विखे पाटील - राधाकृष्ण विखे पाटील नवनिर्वाचित मंत्री
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - 39 दिवसानंतर आज शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आज मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात प्रथम ज्या आमदारानी शपथ घेतली ते भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी. शपथ घेतल्यानंतर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षापासून बरीच जनतेची कामे रखडलेली आहेत. या कामांना गती येण्याचे काम हे आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणार आहे, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.