VIDEO : मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळेच माझ्याविरुद्ध षडयंत्र; खडसे म्हणाले... - एकनाथ खडसे ऑन भाजप
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - सन 2014 मध्ये भाजपचे एकट्याच्या बळावर सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो. मात्र, मला बाजूला करण्यासाठी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले. मला नाहक बदनाम करण्यात आले. माझ्याविरुद्ध एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तरीही पक्षाने माझा गुन्हा काय आहे, ते स्पष्ट केलेले नाही. मी दोषी असेल तर मला निश्चितच शिक्षा दिली पाहिजे. पण मी गुन्हा केलेला नसेल तर माझ्यावर अन्याय का? हा माझा पक्षाला सवाल आहे. पक्षातील काही ठराविक नेत्यांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली आहे, अशा शब्दात माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला आहे.