Eknath Shinde Land Helicopter Samrudhi Highway : मंत्री एकनाथ शिंदेचे हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरले; पहा VIDEO - एकनाथ शिंदेचे हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15026589-thumbnail-3x2-heli.jpg)
वैजापूर (औरंगाबाद ) - बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा येत्या 2 मे रोजी खुला होणार आहे. यानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी आज महामार्गाची पाहणी केली. एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांनी या महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या समृद्धी महामार्गावर हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरवण्यात ( Eknath Shinde Land Helicopter Samrudhi Highway ) आले. त्यांनी महामार्गावर उतरून पाहणी केली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोडणारा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा आकृतीबंध असलेल्या या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते सेलूबाजार आणि जालना ते शिर्डी यादरम्यानचा रस्ता पूर्णपणे तयार आहे.
Last Updated : Apr 15, 2022, 6:34 PM IST