Ajit pawar on Nana Patole : भांड्याला भांडे लागणारच.. नाना पटोलेंच्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया - Ajit pawar on Nana Patole allegation

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 18, 2022, 11:03 AM IST

कराड (सातारा) - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करत ( Nana patole allegation of NCP helping BJP ) असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Ajit pawar on Nana Patole allegation ) यांनी केला आहे. तसेच, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींकडे याबाबतची तक्रार केली असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. या संदर्भात बोलताना अजित पवार ( Ajit pawar news satara ) म्हणाले की, हे चालत असते. एका कुटुंबात भांड्याला भांडे लागते, मग तीन कुटुंबाचे तर लागणारच ना, अशा शब्दांत त्यांनी नाना पटोलेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. भांड्याला भांडे लागू नये म्हणून तीन पक्षाच्या प्रमुखांनी प्रयत्न केला पाहिजे. लक्ष दिले पाहिजे आणि नीटपणे सरकार चालवले पाहिजे, असे सांगून अजित पवार म्हणाले की, पटोलेंनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावे, हा त्यांचा अधिकार आहे. त्याला आम्ही फार महत्व द्यायचे कारण नाही. आमच्याही पक्षात काही झाले तर आम्ही पण कधी कधी मुख्यमंत्री, पवार साहेबांकडे तक्रार करतो. आपल्या देशाने 24 पक्षांचे एनडीए सरकार, अनेक पक्षांचे युपीए सरकार बघितलेले आहे. पंधरा वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार बघितलेले आहे. त्याही वेळेस भांड्याला भांडे लागत होते ना, अशी आठवण अजित पवार यांनी करून दिली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.