BJP National Executive in Hyderabad: हैदराबादमध्ये 'BJP'ची कार्यकारिणी; पहा काय म्हणाले 'CM' योगी - Chief Minister Yogi Adityanath in Hyderabad
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद (हैदराबाद) - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री योगी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. एकीकडे मुख्यमंत्री योगी यांनी तेलंगणाचे सीएम 'KCR' यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, आता भाग्यनगरचे नशीब बदलण्याची वेळ आली आहे. भाजप येथेही यूपीप्रमाणेच सरकार चालवेल. त्याचवेळी मुख्यमत्री केसीआरवर निशाणा साधताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ते आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यात व्यस्त आहेत. तरुणांची बेरोजगारी आणि लोकांच्या समस्यांशी त्यांना काही देणेघेणे नाही. ( Chief Minister Yogi Adityanath In Hyderabad ) त्यांनी केसीआर यांना आव्हान देत आज किंवा कधीही निवडणुका घ्यायच्या असतील तर पुढचे सरकार भाजपचेच स्थापन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पहा मुख्यमंत्री योगी नेमकं काय म्हणाले-
Last Updated : Jul 3, 2022, 7:30 PM IST