Throwing Stones at Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक; पोलिसांत दिली तक्रार - Throwing Stones at Chitra Wagh
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर दोऱ्यावर असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाघ यांनी याबाबत कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बडकवडे यांच्याकडे तक्रार केली आहे. (Throwing Stones at Chitra Wagh In Kolhapur) संबंधितांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सभेच्या मागील बाजूवरून दोन दगड मारले गेले असल्याचे पोलीस प्रमुखांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच, परिसरातील सीसीटीव्हीही तपासला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST