नाशिक : येवल्यातील युवा शेतकऱ्याने सव्वा एकरात लावले 5 हजार झेंडूची रोपे - नाशिक ताज्या बातम्या
🎬 Watch Now: Feature Video

नाशिक - दसरा सणाला अनेक फूल उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या तडाख्यामुळे झेंडूचे फुले फेकून देण्याची वेळ आली होती. मात्र, येवल्यातील नागडे येथील वाल्मिक सातळकर या फुल उत्पादक शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत सव्वा एकरमध्ये झेंडूची 5 हजार रोपे लावत झेंडूचे पीक घेतले असून याकरता या शेतकऱ्याला 60 ते 70 हजार रुपये खर्च आला आहे. दिवाळी सणानिमित्त झेंडूची फुले विक्री होऊन लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन हा फूल उत्पादक शेतकरी सध्या फुले तोडून नाशिक बाजार समितीत विक्रीस नेत आहे.